लखलखता तो सूर्यदेव, करे समस्त संसार प्रखर,
पण मावळताना तोही लाजे, दिसे आणखी सुंदर,
मावळल्यावर आकाशात येते चंद्र चांदणे,
कालरात्रीत चमकून सजवे आकाशी आंगणे,
त्या आकाशाच्या खाली, समुद्र करीत असे गीत सादर,
रूप त्याचे अफाट सुंदर, असे अनेकांचं ते घर,
गात असत सुरेल समुद्र,सुंदर दिसे नजारे,
मावळत्या सूर्याची किरणे चमकवते त्याचे किनारे.
~bhargav
Very nice Bhargav